मालवण (प्रतिनिधी)
मालवण तालुक्यातील वायरी जाधववाडी येथील श्री समर्थ रामदास मठात श्री समर्थ रामदास नवमी उत्सव व १८ वा वर्धापन दिन सोहळा सोमवार दि. २ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा होणार आहे.
या उत्सवानिमित्त दि. २ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वा. मूर्ती अभिषेक व पूजा, सकाळी १० वा. होम-हवन, दुपारी १२ वा. महाप्रसाद, सायंकाळी ७ वा. संगीत भजन तर रात्री १० वा. आजगावकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. दि. ३ रोजी रात्री १० वा. दत्त माऊली दशावतार नाट्यमंडळ, दि. ४ रोजी बाल दांडेश्वर दशावतार नाट्यमंडळ, दि. ५ रोजी खानोलकर दशावतार, तर दि. ६ रोजी अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळाचे दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहेत.
दि. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वा. मूर्ती पूजन, सकाळी ९ वा. श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वा. महाप्रसाद, सायंकाळी ७ वा. संगीत भजने व रात्री ९.३० वा. खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा होणार आहे. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी नाना नाईक (मो. ९४०४९१६००९) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दि. १० फेब्रुवारी रोजी रात्री १० वा. देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळाचा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. दि. ११ फेब्रुवारी रोजी श्री समर्थ रामदास नवमी उत्सव साजरा करण्यात येणार असून सकाळी ८ वा. स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक व पूजा, सकाळी १० वा. स्वामींना भिक्षा वाढवण्याचा कार्यक्रम, दुपारी १२ वा. महाप्रसाद, सायंकाळी ७ वा. संगीत भजने, रात्री ९ वा. पारितोषिक वितरण समारंभ आणि रात्री १० वा. सुधीर कलिंगण प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार मंडळाचा ट्रिकसीनयुक्त महान पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे.
तसेच दि. १४ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वा. लेखक श्री नाट्यमिनार कलानिकेतन, वायरी भूतनाथ जाधववाडी यांचे ‘आमच्या या घरात’ (लेखक – प्रवीण शांताराम) हे सामाजिक नाटक सादर होणार आहे.
या सर्व कार्यक्रमांचा भाविक व ग्रामस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री समर्थ रामदास स्वामी युवा कलाक्रीडा मित्रमंडळ, वायरी जाधववाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.







