मालवण : (प्रतिनिधी)
काही दिवसांपूर्वी तारकर्ली येथे लागलेल्या आगीत होडी जळून मोठे नुकसान झालेल्या दाजी कुबल या मच्छिमारास आवारवाडी ग्रुपतर्फे मासेमारीसाठी लागणारी जाळी देऊन मदत करण्यात आली.
या दुर्घटनेमुळे उपजीविकेचे साधन हिरावून गेल्याने दाजी कुबल अडचणीत सापडले होते. ही बाब लक्षात घेऊन आवारवाडी ग्रुपने पुढाकार घेत त्यांना जाळीची मदत केली. या उपक्रमामुळे कुबल यांना पुन्हा मासेमारी सुरू करण्यास दिलासा मिळणार आहे.
यावेळी बबलू मोंडकर, भाऊ मोर्जे, विष्णू मालंडकर, पांडू मालंडकर, अक्षय मोर्जे, निलेश मोंडकर, जॉन फर्नाडीस, बंटी परब, डेविड फर्नाडीस, राजेश हुले, इसेज डिसोजा, मंगेश कोयंडे, प्रविण पराडकर आदी उपस्थित होते.







