प्रजापिता ब्रम्हकुमारीन ईश्वरीय विश्वविद्यालयाचे आंतरराष्ट्रीय व्याख्याते राजयोगी डॉ. सचिन परब यांचे ‘टेशन फ्री जीवन आणि व्यसनमुक्ती’ या विषयावर विशेष व्याख्यान २१ जानेवारी रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत नगरपालिकेच्या स्वामी विवेकानंद कौशल्य विकास सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.
डॉ. सचिन परब हे प्रजापिता ब्रकुमारीज इत्वरीय विश्वविद्यालयाचे प्रमुख व्याख्याते आहेत. त्यांनी देश आणि विदेशात अनेक ठिकाणी टेन्शन फ्री जीवन आणि व्यवनमुक्ती या विषयावर मार्गदर्शन केले आहे. कार्पोरेट ट्रेनर, काऊंन्सलर आणि खुशी कोच म्हणूनही देशभरात प्रसिद्ध आहेत. एमबीबीएस, एमबीए एमएससी, पीडीसीआर आदी पदव्या प्राप्त असलेल्या डॉ. परब यांनी अनेकांना व्यसनमुक्तही केले आहे. ब्रम्हकुमारीजच्या व्यसनमुक्ती अभियानाद्वारे ते देशभरात विविध उपक्रम घेतात. त्यांच्या या व्याख्यानाचा वेंगुर्लातील डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय विद्यार्थी कर्मचारी, शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थी तसेच नागरिकांनी या व्याख्यानाला उपस्थित रहावे, असे आवाहन नगराध्यक्ष दिलीप गिरप व मुख्याधिकारी हेमंत किरूळकर यांनी केले आहे.
कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे व्यसन सोडायची मनापासून इच्छा असेल त्यांनी प्रजापिता ब्रह्मकुमारीज विद्यालयाच्या माणिकचौक वेंगुर्ले येथील शाखेत संपर्क साधावा, असेही आवाहन डॉ. सचिन परब यांनी केले आहे






