मालवण | प्रतिनिधी
“डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला असतानाही दत्ता सामंत यांच्यासारख्या कार्यकर्त्याच्या वाढदिवसानिमित्त येथे येण्याचा मोह मला आवरता आला नाही. डॉक्टरांच्या औषधांपेक्षा आपली माणसं, कार्यकर्ते आणि जनतेचं दर्शन घेऊन जे समाधान मिळतं, ते कोणत्याही औषधातून मिळत नाही,” असे भावनिक प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार ना. नारायण राणे यांनी केले.

या सोहळ्याला व्यासपीठावर सौ. नीलम राणे, सौ. दीक्षा सामंत, विजयालक्ष्मी सामंत, दीपक परब, नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर, नगरसेवक दीपक पाटकर, संदीप कुडतरकर, उमेश नेरुरकर, बाळू कुबल, संजय पडते, संजय आंग्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

मालवण येथील कुंभारमाठ येथे शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत यांच्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा मंगळवारी रात्री उशिरा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला ना. नारायण राणे स्वतः उपस्थित राहून त्यांनी दत्ता सामंत यांना शुभेच्छा दिल्या. “दत्ता सामंत यांच्या हातून यापुढेही अधिकाधिक समाजोपयोगी कार्य घडो, जनतेच्या हितासाठी त्यांची वाटचाल अखंड सुरू राहो,” अशा सदिच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत म्हणाले, “गुरूंचा आशीर्वाद पाठीशी असेल तर कोणीही आपल्याला अडवू शकत नाही. माझ्या पाठीशी नारायण राणे यांचा आशीर्वाद आहे. राणे साहेबांची शिकवण, त्यांचे गुण मी आत्मसात केले आणि त्याच बळावर मी एक यशस्वी उद्योजक म्हणून उभा राहिलो. त्यांनी माझ्यावर सोपवलेली प्रत्येक जबाबदारी मी प्रामाणिकपणे आणि यशस्वीपणे पार पाडली आहे. ‘नारायण राणे’ हा माझा ब्रँड आहे. या ब्रँडवर मी गेली ३५ वर्षे ठामपणे उभा आहे आणि त्याच नावावर जनतेसाठी काम करत आहे,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.

या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला काका कुडाळकर, नगरसेवक पूनम चव्हाण, नीना मुंबरकर, सिद्धार्थ जाधव, अश्विनी कांदळकर, संग्राम साळसकर, विश्वास गावकर, राजा गावकर, महेश कांदळगावकर, राजू बिडये, संदेश शिरसाट, सुधीर साळसकर, अनिल कांदळकर, पंकज वर्दम, मनमोहन वराडकर, सुनील घाडीगावकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक, शिवसैनिक, दत्ता सामंत प्रेमी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

संपूर्ण कार्यक्रमात उत्साह, आपुलकी आणि नेतृत्वावरील विश्वासाचे दर्शन घडत असून दत्ता सामंत यांच्या सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी हा सोहळा प्रेरणादायी ठरला.






