मालवण (प्रतिनिधी) : लायन्स क्लब, मालवण यांच्या वतीने क्लब सदस्य श्री. उदय घाटवळ यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत पणदूर येथील संविता आश्रमास जीवनावश्यक वस्तू प्रदान करण्यात आल्या. यावेळी आश्रमातील निराधारांसाठी अन्नदानाचाही उपक्रम राबविण्यात आला.
समाजातील गरजू घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविणे हेच लायन्स क्लबचे उद्दिष्ट असून, अशा उपक्रमांमधून सामाजिक जाणिव जपली जात असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. वाढदिवसाचे औचित्य साधून केलेल्या या उपक्रमाचे आश्रम व्यवस्थापन व लाभार्थ्यांकडून विशेष स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमास लायन्स क्लबच्या अध्यक्षा अनुष्का चव्हाण, क्लब सदस्य उदय घाटवळ, अवधूत चव्हाण, उमेश शिरोडकर, शांती पटेल, मुकेश बावकर, अनिल गावडे, स्नेहा घाटवळ, नंदिनी गांवकर, उमेश राणे, जगन्नाथ जुवेकर आदी उपस्थित होते.
लायन्स क्लब, मालवण यांच्यावतीने पुढेही असेच सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.





