मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील महाविद्यालय-स्तरीय विद्यार्थी मंडळ निवड प्रक्रियेत विज्ञान विभागातील विद्यार्थी सर्वेश महेंद्र राणे याची जनरल सेक्रेटरी (GS) पदी निवड झाली.
महाविद्यालयातील विविध उपक्रमांत सक्रिय सहभाग आणि विद्यार्थ्यांमध्ये असलेली लोकप्रियता याच्या जोरावर सर्वेशने ही निवड मिळवली.
या यशाबद्दल स. का. पाटील महाविद्यालय, विज्ञान विभाग, सांस्कृतिक विभाग, जिमखाना विभाग तसेच कृ. सी. देसाई शिक्षण संस्था यांच्या वतीने सर्वेश राणे याचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.






