मालवण : प्रतिनिधी
कांदळगाव येथील ओझर विद्यामंदिरच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा यंदाही जपली. माजी विद्यार्थी उमेश कोदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकारातून ओझर विद्यामंदिर येथे माजी शिक्षक जयसिंगराव गणपती जाधव यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी उमेश कोदे यांनी लिहिलेला ‘गुरुवरा हृदयेश्वर तू खरा’ हा लेख जयसिंगराव जाधव यांना समर्पित करण्यात आला. त्यानंतर सन्मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन जाधव यांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला ओझर विद्यामंदिरच्या माजी मुख्याध्यापिका यू. डी. मुरवणे, एस. एस. पेडणेकर, माजी विद्यार्थी तथा समाज कल्याण सहआयुक्त श्यामसुंदर पेडणेकर, माजी प्राथमिक शिक्षिका अंजली अशोक कांदळगावकर, माजी प्राथमिक शिक्षक सदानंद कांबळी, केंद्रप्रमुख प्रशांत पारकर, पंचायत समिती सदस्या योजना कांबळी, शालेय समिती सदस्य जयराम कांबळी, माजी विद्यार्थी व अभिनेते बाळ नरे, आर. पी. बागवे हायस्कूल, मसुरेच्या शिक्षिका अर्चना उमेश कोदे, ओझर विद्यामंदिरचे मुख्याध्यापक डी. डी. जाधव, पी. के. राणे, लिपिक रविराज जाधव, कर्मचारी मधुसूदन परुळेकर, विमा प्रतिनिधी सच्चिदानंद गोलतकर आदी उपस्थित होते.
यावेळी १९८०-८१ च्या बॅचचे माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी, ग्रामस्थ तसेच माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात ओझर विद्यामंदिरचे माजी विद्यार्थी किशोर नारायण नरे, एस. एस. पेडणेकर, यू. डी. मुरवणे, बाळ नरे, सदानंद कांबळी, पंचायत समिती सदस्या योजना कांबळी आणि प्रशांत पारकर यांचाही सत्कार करण्यात आला.
पी. आर. पारकर यांनी सूत्रसंचालन केले, तर उमेश कोदे यांनी आभार मानले.
शिक्षकांनी दिलेल्या संस्कारांची आणि मार्गदर्शनाची आठवण ठेवत माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंचा केलेला हा सन्मान उपस्थितांसाठी भावनिक आणि प्रेरणादायी ठरला.






