दुर्ग मावळा प्रतिष्ठानतर्फे किल्ले निवती येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वच्छता व संवर्धन मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत किल्ल्यावरील महादरवाज्याची विशेष स्वच्छता करण्यात आली. झाडी-झुडपांनी झाकोळलेला हा ऐतिहासिक दरवाजा स्वच्छ करून मोकळा करण्यात आला, त्यामुळे किल्ल्याचे प्राचीन वैभव पुन्हा स्पष्ट दिसू लागले आहे.
संस्थेच्या स्वयंसेवकांनी मोठ्या उत्साहात हातात हात घालून किल्ल्याच्या परिसरातील घाण, कोसळलेली झुडपे, कचरा आणि गवत काढण्याचे काम केले. किल्ल्याचे अस्तित्व जपण्यासाठी आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे सर्वांनी मत व्यक्त केले.
या स्वच्छता मोहिमेत स्वप्निल साळसकर, ज्ञानेश्वर राणे, यतिन सावंत, प्रसाद पेंडूरकर, साईप्रसाद मसगे, हेमलता जाधव, समिल नाईक आणि गणेश नाईक यांनी सहभाग घेतला. सर्वांच्या सहभागामुळे मोहीम यशस्वीपणे पार पडली.






