मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना विभाग (एनसीसी) यांच्यावतीने राष्ट्रीय छात्र सेना दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य कैलास राबते यांच्या हस्ते एनसीसी झेंडावंदन करण्यात आले. राष्ट्रीय छात्र सेना विभाग प्रमुख असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट प्रा. डॉ. मल्लेश खोत यांनी एनसीसी पायलटिंग करत सन्मानाने कार्यक्रम स्थळापर्यंत घेऊन गेले. यावेळी गितांजली चंद्रकांत चव्हाण, ईशा गंगाधर दुखंडे, नियती भिवा पारकर, पुजा तुकाराम पांढरे या एनसीसी विद्यार्थिनी पायलेटिंग केले.
त्यानंतर प्राचार्यांच्या हस्ते एनसीसी झेंडावंदन झाल्यानंतर राष्ट्रगीत, एनसीसी शपथ आणि एनसीसी राष्ट्रीय गीत म्हटले गेले. एनसीसीची विद्यार्थिनी ममता तनवी हिची राज्यपातळीवर कबड्डी स्पर्धेमध्ये निवड झाल्याबद्दल तिचा प्रा.राबते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच प्रा. कैलास राबते यांची प्राचार्य पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा एनसीसी विभागामार्फत प्रा. डॉ. देविदास हारगिले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यानंतर प्राचार्य कैलास राबते यांनी आपल्या मनोगतामध्ये एनसीसी बद्दल माहिती देऊन देशाचा विकास आणि एनसीसीची भूमिका काय असावी या संदर्भातही त्यांनी मार्गदर्शन केले. देशाला पुढे नेण्यासाठी आणि देशाच्या संरक्षणासाठी सक्षम नवीन पिढी तयार करणे ही काळाची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी कुणाल सहदेव वेंगुर्लेकर, शांतराम प्रकाश बागवे, प्रगती बाळकृष्ण भांडे, निर्जरा विलास कांबळी, विनय अर्जुन खोबरेकर या एनसीसीच्या चार विद्यार्थ्यांनी ट्रूप कमांडिंग केले. या कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन सर्व एनसीसी सिनिअर सर्व एनसीसी कॅडेट्स आणि एनसीसी विभाग प्रमुख प्रा. डॉ. मल्लेश खोत यांनी केले होते.







