मालवण दि प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) व पूर्व माध्यमिक (इयत्ता आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेत डॉ शिरोडकर एज्युकेशन सोसायटी संचलित श्री रेकोबा माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत कु. वेदिका परशुराम लुडबे हिने ग्रामीण सर्वसाधारण गटातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाचवा क्रमांक पटकावत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. तसेच कु. सुकन्या विश्वजित लोके हीदेखील यशस्वी ठरली. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता पाचवी) कु. मानसी महेश भगत हिनेही यश मिळवून विद्यालयाच्या यशात भर घातली.
या तिन्ही विद्यार्थ्यांना शिक्षक प्रवीण कुबल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक संजय खोचरे, पालक संघाचे उपाध्यक्ष विरेश नाईक, तारकर्लीचे सरपंच मयेकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक तसेच माजी व आजी विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे







