मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील ग्रंथालय विभागाद्वारे संविधान दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाची उद्देशिका वाचून झाली. त्याचबरोबर संविधानाच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. के के राबते, ग्रंथालय प्रमुख प्रा.संग्राम सिंह पवार, प्रा.डॉ.हंबीरराव चौगुले , डॉ.उज्वला सामंत, डॉ. डी व्ही हारगीले,डॉ. सुमेधा नाईक,डॉ.एम आर खोत,प्रा. एस पी खोबरे,प्रा हसन खान,प्रा.फाटक,प्रा.तावडे,प्रा. खरात,प्रा. स्नेहा बर्वे,प्रा. अन्वेषा कदम,प्रा. मिलन सामंत, प्रा. धामापूरकर तसेच ५८ महाराष्ट्र बटालियनचे अधिकारी श्री. नेगी व श्री. जामवंत उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ.हंबीरराव चौगुले यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना संविधान दिनाचे महत्त्व पटवून देताना संविधानाची निर्मिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान, संविधानाचे महत्त्व, भारतीय संविधानाने भारतीय नागरिकांना दिलेले अधिकार, कर्तव्ये याबाबत माहिती देतानाच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षा निमित्त संविधान दिन सुरू करण्यात आला, असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य के. के. राबते यांनी संविधानाने सर्वांना समान अधिकार बहाल केले असून समाजातील असमानता संविधानाने नष्ट केली, तसेच स्त्रियांना, दुःखी कष्टी लोकांना तसेच गरिबांना सन्मानाने जगण्यासाठी बळ दिले, असे सांगितले.
या निमित्ताने महाविद्यालयाच्या ग्रंथालया कडून ऑनलाईन प्रश्न मंजूषेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उद्देशिका वाचन ग्रंथपाल संग्राम सिंह पवार यांनी केले. आभार डॉ. सुमेधा नाईक यांनी मानले. कार्यक्रमासाठी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक एन.सी.सी व एन.एस.एस विद्यार्थी तसेच कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते.







