मालवण (प्रतिनिधी)
पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा चिंदर नं.१ मध्ये शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न झाला. यावेळी सर्व नवागत विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने शिक्षिकांनी कुंकू तिलक लावून व पुष्पगुच्छ देऊन आणि आरती ओवाळून तसेच गोड खाऊ वाटून स्वागत केले. इयत्ता पहिली मध्ये नव्याने दाखल होणाऱ्या चिमुकल्या सहा विद्यार्थ्यांचे पायाचे ठसे सफेद कोऱ्या कागदावर उमठविण्यात आले. या पायाच्या ठशाची एक प्रत पालकांना देण्यात आली. तर एक प्रत शाळेकडे रेकॉर्डला ठेवण्यात आली. या अभिनव उपक्रमाचे पालकांनी स्वागत केले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व विद्येची देवता श्री देवी सरस्वतीला पुष्पहार अर्पण करून झाली. तसेच शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना शालेय, गणवेश, वह्या, पुस्तके उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सेवा निवृत्त शिक्षक रावजी तावडे, हवालदार संतोष सावंत, चिंदर सेवा संघाचे विवेक परब, ग्रा.पं.सदस्य जान्हवी घाडी, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सौ चिन्मयी पाताडे, वेदीका घाडी, मंजिरी केळकर, निलिमा घाडी, ब्राम्ही दत्तदास, भालचंद्र कावले, श्रीकांत कानविंदे, अर्जुन पवार, दिपक तावडे, मिलिंद चिंदरकर, समिर लब्दे, नंदिनी पावसकर, विनिता मसुरकर, निलिमा घाडी, सुनंदा अपराज, निर्मिती घाडी, अर्पिता पाडावे, अश्विनी पाताडे, जि.प.केंद्र शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्रप्रसाद गाड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
यावेळी शाळेच्या अद्ययावत संगणक कक्षाचे उद्घाटन हवालदार संतोष सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यासाठी विधानपरिषद शिक्षक मतदार संघातील आमदार ॲड. निरंजन डावखरे यांच्या निधीतून मिळालेला एक संगणक व चिंदर ग्रामपंचायतच्या १५ वित्त आयोग निधीतून एक लॅपटॉप तसेच शाळेतील इतर संगणक उपलब्ध झाले आहेत. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्रप्रसाद गाड, शिक्षक नंदकुमार जुंधळे, सौ. वैशाली चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. गाड यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षक सचिन तवटे यांनी केले.







