मालवण (प्रतिनिधी)
मालवण तालुक्यातील ६ जिल्हा परिषद मतदार संघातील व १२ पंचायत समिती मतदार संघातून शिवसेना पक्षातर्फे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्यांसाठी शिवसेना पक्षाचे इच्छुक उमेदवारी अर्ज मालवण येथील कोणार्क हॉटेल शेजारील शिवसेना पक्ष कार्यालयात उपलब्ध करण्यात आले असून दि. १६ ते १७ जानेवारी पर्यंत सकाळी १० ते दुपारी १ वा. पर्यंत व संध्या ३ ते ६ वा. पर्यंत अर्ज मिळणार आहेत, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिली आहे.
ज्यांना निवडणूक लढविण्याची इच्छा आहे त्यांनी इच्छुक उमेदवारी अर्ज घेणे आवश्यक असून विहीत वेळेत पुन्हा शिवसेना शाखेत देणे बंधनकारक आहे, असे आवाहनही जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केले आहे.







