अलिबाग | राज्यातील विविध नगरपरिषदांच्या निवडणूक प्रक्रियेत आज महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला. अलिबाग नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे उमेदवार ऍड. अंकित बांगेरा यांनी आज उमेदवारीचे नामांकन अर्ज दाखल करून मतदारांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे.
राज्यात नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांचे लक्ष अलिबागकडे लागले असताना, भाजपाकडून तरुण आणि उदयोन्मुख नेतृत्व म्हणून अंकित बांगेरा यांच्या उमेदवारीची घोषणा झाली. यावेळी मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
नामांकन दाखल केल्यानंतर बोलताना ऍड. बांगेरा म्हणाले, “अलिबागच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक आणि उत्तरदायी प्रशासन देण्याचा निर्धार आम्ही केला आहे. नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा प्रयत्न करू.” त्यांनी जनतेच्या आशीर्वादाची अपेक्षा व्यक्त केली आहे.
या उमेदवारीमुळे अलिबाग नगरपरिषदेत चुरस वाढण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत.







