नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेत प्रचाराची मुदत वाढवली आहे. वाढत्या उत्साहात सुरू असलेल्या निवडणूक प्रचाराला वाढीव वेळ उपलब्ध करून देत, पक्ष व उमेदवारांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी ठरली आहे.
नवीन आदेशानुसार, 1 डिसेंबरच्या रात्री 10:00 वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे. याआधी प्रचारासाठी निश्चित वेळ कमी असल्याने अनेक उमेदवारांनी वाढीव वेळ देण्याची मागणी केली होती. राज्य निवडणूक आयोगाने परिस्थितीचा विचार करून हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
२ डिसेंबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी यापूर्वी ३० नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत जाहीर प्रचारा साठी मुदत देण्यात आली होती. मात्र आता सुधारित आदेश जारी करताना ही मुदत १ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत वाढवून देण्यात आली आहे. त्या वेळेपासुन सभा/ मोर्चे/ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. तसेच निवडणूक प्रचाराशी संबंधीत जाहिरात प्रसिध्दी / प्रसारण देखील बंद होईल. असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
मुदतवाढ मिळाल्याने सर्वच नगरपरिषद व नगरपंचायत मतदारसंघांमध्ये प्रचाराला आणखी गती मिळण्याची शक्यता असून, मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना अतिरिक्त संधी प्राप्त झाली आहे.
निवडणुकीचा अंतिम टप्पा जवळ येत असताना राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.






