लांजा | आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतून लढवण्यात येत असलेल्या उमेदवारांच्या विजयाबाबत आमदार किरण सामंत यांनी ठाम भूमिका व्यक्त केली आहे. बंडखोरांच्या हालचालींवर भाष्य करताना ते म्हणाले की, बंडखोरांवर योग्य ती कारवाई केली जाईल आणि त्यांच्या भूमिकेचा महायुतीच्या घडीवर कोणताही परिणाम होणार नाही.
महायुतीमधील सर्व १७ जागा प्रचंड बहुमताने निवडून येणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच, नगराध्यक्ष पदाचा आमचा उमेदवार किमान चार हजारांहून अधिक मतांच्या फरकाने विजयी होईल, असा ठाम दावा त्यांनी केला.
यामुळे लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीत महायुतीने जोरदार विजय मिळवण्यासाठी तयारी जलद गतीने सुरू असल्याचे स्पष्ट झाले असून, विरोधकांवर मानसिक दबावही निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.







