मालवण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्य, सेवा आणि सिद्ध कामगिरीचा ठसा उमटवणारे माजी नगराध्यक्ष सुदेश सुबोधराव आचरेकर यांच्याबाबत नागरिकांमध्ये पुन्हा सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे. तब्बल ३० वर्षांचा प्रभाग नेतृत्वाचा अनुभव आणि १४ हून अधिक वर्षे नगराध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, पर्यटन सुविधा आणि मूलभूत गरजांवर भर देत शहराची वाटचाल दिशादर्शक केली आहे.
आचरेकर यांची खास ओळख म्हणजे जनतेच्या सुखदुःखात धावून जाणारी कार्यशैली. समस्या उद्भवल्या की सर्वप्रथम आवाज उठवणारे, समाधान मिळेपर्यंत मागे न हटणारे आणि अपक्ष असतानाही प्रभागाचा विश्वास अबाधित ठेवणारे नेते अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे. ९ वर्ष सत्तेबाहेर राहूनही विकासाच्या गतीत कुठेही खंड पडू दिला नाही, ही बाब शहरवासीयांमध्ये विशेष कौतुकास्पद ठरते.
मालवणसाठी आचरेकर यांचे विकास व्हिजन
1️⃣ स्वच्छ आणि सुंदर मालवण — शहरातील स्वच्छता व्यवस्थेला कायमस्वरूपी ढाचा देणे, कचरा व्यवस्थापन सुधारणा यावर त्यांचा विशेष भर.
2️⃣ रस्ते आणि मूलभूत सुविधा — अरुंद रस्ते समस्येचे निराकरण, गटारे–ड्रेनेज दुरुस्ती, पाणीपुरवठ्याची गुणवत्ता आणि भूमिगत वीजवाहिन्यांची कामे पूर्ण करणे हा प्राधान्यक्रम.
3️⃣ पर्यटनाला जागतिक दर्जा — दिशादर्शक बोर्ड, पार्किंग व्यवस्था, पर्यटकांसाठी सुधारित सुविधा तसेच सिंधुदुर्ग किल्ला होडी व्यवसायातील प्रलंबित प्रश्न सोडविण्याची हमी.
4️⃣ मच्छीमार व पर्यटन व्यवसायिकांसाठी आधार — मच्छीमार बांधवांच्या अडचणींना थेट पाठबळ आणि पर्यटन व्यवसायिकांना मूलभूत सुविधा व सुरक्षितता उपलब्ध करून देण्याचे आश्वासन.
5️⃣ वीज पुरवठा सुधारणा — मेढा आणि शहरातील कमी दाबाच्या वीज समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून नवीन ट्रान्सफॉर्मर आणि उच्च क्षमतेची व्यवस्था.
मालवणच्या स्थानिक राजकारणात सातत्याने प्रभावी ठसा उमटवणारे सुदेश सुबोधराव आचरेकर यांच्याबाबत निवडणूकपूर्व वातावरणात पुन्हा एकदा सकारात्मक चर्चा रंगत आहे. त्यांच्या कार्यशैलीतील पारदर्शकता, शहरविकासात त्यांचा असलेला सहभाग आणि अनुभवी नेतृत्वामुळे अनेक नागरिकांचा कल त्यांच्याकडे वळताना दिसत आहे.







