कणकवली | आगामी कणकवली नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी “कणकवली शहर विकास आघाडी”तर्फे संदेश भास्कर पारकर हे अखेर रिंगणात उतरले आहेत. सोमवार, दि. १७ नोव्हेंबर २०२५ रोजी ते आपल्या सहकाऱ्यांसह उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, अशी माहिती त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सकाळी १० वाजता कणकवलीचे ग्रामदैवत श्री देव स्वयंभू आणि परमपूज्य भालचंद्र महाराज यांच्या दर्शनाने या अभियानाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या वेळी कणकवली शहर विकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
संदेश पारकर हे जनसामान्यांशी घट्ट नाळ जोडणारे स्थानिक नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखालील या आघाडीने या निवडणुकीत विकासाचा नवा आराखडा उभा करण्याचा संकल्प केला आहे.







