मालवण,
मालवण नगर परिषद निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवार म्हणून सौ. ममता वराडकर यांच्यासह नगरसेवक पदासाठीचे उमेदवार श्री. दीपक पाटकर, श्री. महेश कोयंडे आणि इतर उमेदवार यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले. निवडणूक निर्णय अधिकारी श्री. सूर्यकांत पाटील आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच मुख्याधिकारी श्री. प्रतीक थोरात यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर करताना कुडाळ-मालवणचे आमदार माननीय निलेशजी राणे साहेब प्रमुख उपस्थित होते.
या प्रसंगी आमदार निलेश राणे यांनी सर्व उमेदवारांचे अभिनंदन करताना, “मालवण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या प्रगतीसाठी शिवसेना पक्ष कटिबद्ध आहे. जनतेचा विश्वास संपादन करून मालवणला विकासाच्या नवनवीन वाटा खुल्या करणे हे आमचे ध्येय आहे,” असे सांगितले.
यावेळी माजी आमदार श्री. राजन तेली, शिवसेना उपनेते श्री. संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, श्री. संजय पडते, जिल्हा सचिव श्री. दादा साईल, महिला जिल्हाप्रमुख सौ. दीपलक्ष्मी पडते, श्री. उमेश नेरुरकर, श्री. काका कुडाळकर यांच्यासह शिवसेना पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उत्साहाने उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात गजर करण्यात आला.
उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर सर्व उमेदवारांना पुढील निवडणूक प्रक्रियेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या असून, मालवणच्या जनतेला विकास आणि प्रगतीचे आश्वासन देत शिवसेनेने निवडणुकीचा बिगुल फुंकला आहे.





