नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार दिलीप गिरप यांनी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे तसेच सौ. नीलम राणे यांची विशेष भेट घेत त्यांच्या आशीर्वादाची परंपरेने सुरुवात केली.
या भेटीत पालकमंत्री नितेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. उपस्थित सर्व मान्यवरांमुळे भेटीचे महत्त्व अधिक वाढले.
या प्रसंगी खासदार नारायण राणे यांनी दिलीप गिरप यांच्यासोबत निवडणुकीच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा केली. नगरपरिषदेसाठीच्या आगामी निवडणुकीत पक्षाच्या संघटनात्मक तयारीपासून ते प्रभागनिहाय मतदानाच्या समीकरणांपर्यंत विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन केले.
खासदार राणे यांनी दिलीप गिरप यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा आणि यशस्वी वाटचालीसाठी आशीर्वाद देत विजयाची खात्री व्यक्त केली. या भेटीनंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.







