मालवण | मालवण नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीतर्फे भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 25 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5.00 वाजता, मालवण येथील टोपीवाला हायस्कूल पटांगणावर ही सभा पार पडणार आहे.
या प्रचार सभेला भाजप प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्रजी चव्हाण, सिंधुदुर्गाचे पालकमंत्री मा. नितेश राणे, तसेच भाजप सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीने विशेष महत्व लाभणार आहे.
सभेत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शिल्पा यतीन खोत यांच्यासह भाजपचे 20 नगरसेवक उमेदवार जनतेसमोर आपले भविष्यदर्शी विचार मांडणार असून, विकासाच्या दिशा-धोरणांवर प्रकाश टाकणार आहेत.
या भव्य प्रचार सभेसाठी तालुका शहर अध्यक्ष विष्णू मोंडकर आणि तालुका अध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी मालवण वासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उमेदवारांना पाठिंबा दर्शवावा, असे आवाहन केले आहे.







