मालवणमध्ये मनसे पक्षाचे माजी शहराध्यक्ष श्री. विशाल ओटवणेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करून स्थानिक राजकारणात नवा भूचाल निर्माण केला.
या प्रवेश सोहळ्यास आमदार निलेश राणे साहेबांची उपस्थिती लाभल्याने या प्रवेशाला विशेष वजन प्राप्त झाले.
ओटवणेकर यांच्यासोबत श्री. आनंद धुरी, श्री. महेश गावडे, श्री. प्रतीक ओटवणेकर, श्री. प्रशांत प्रभू, कु. वैष्णवी ओटवणेकर, कु. नेहा हळदणकर आदी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा झेंडा हातात घेतला.
या मोठ्या गटप्रवेशामुळे मालवणमध्ये शिवसेनेची संघटनात्मक ताकद दुणावली असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाला मोठा फायदा मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
आमदार निलेश राणे यांनी या नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना सांगितले की,
“मालवणच्या विकासासाठी एकजुटीची गरज आहे. सक्षम नेतृत्व आणि मजबूत संघटनानेच मालवणला नवी दिशा देता येईल.”
मालवणमध्ये शिवसेनेचा प्रभाव वाढत असताना, विरोधकांसाठी ही घडामोड चिंतेची घंटा ठरू शकते, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. स्थानिक स्तरावर मनसेची ताकद कमी झाल्याने त्यांच्या संघटनात्मक रचनेलाही धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकूणच, या प्रवेशामुळे शिवसेना मालवणमध्ये नव्या ऊर्जेसह आगामी निवडणुकांसाठी अधिक सज्ज झाली आहे.







