रत्नागिरी : निवडणुकांचा काळ जवळ आला की अनेकदा पैशांचा वापर, आश्वासनांची खैरात आणि राजकीय डावपेच पाहायला मिळतात. मात्र, रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीच्या धामधुमीत एका उमेदवाराच्या पोस्टरने आणि त्यावरील एका वाक्याने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले आहे. “पैसे कष्टाने कमवीन, मत काम करून मिळवीन” या एका वाक्याने सध्या रत्नागिरीत नैतिक राजकारणाची नवी चर्चा सुरू झाली आहे.
रत्नागिरी नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ५ मधून सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि युवा उद्योजक सौरभ मलुष्टे नगरसेवकपदाची निवडणूक लढवत आहेत. निवडणुकीच्या रिंगणात पाऊल टाकताच त्यांनी आपल्या स्वच्छ आणि पारदर्शक हेतूची ग्वाही दिली आहे. सध्या त्यांच्या प्रचाराचे एक पोस्टर सोशल मीडियावर आणि शहरात व्हायरल होत आहे, ज्यावर स्पष्टपणे लिहिले आहे – ‘पैसे कष्टाने कमवीन, मत काम करून मिळवीन’.
सौरभ मलुष्टे हे केवळ उमेदवार नाहीत, तर त्यांनी शून्यातून विश्व निर्माण करत स्वकर्तृत्वावर आपला व्यवसाय उभारला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते निस्वार्थपणे समाजकार्य करत आहेत. राजकारणात सुशिक्षित, प्रामाणिक आणि काम करणाऱ्या तरुणांनी आले पाहिजे, ही काळाची गरज असताना सौरभ मलुष्टे यांच्या रूपाने रत्नागिरीकरांना एक सक्षम पर्याय मिळाला आहे.
केवळ घोषणाबाजी न करता, सौरभ यांनी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात कामाची १०० टक्के पारदर्शकता (Transparency) जपण्याची हमी दिली आहे. नागरिकांच्या पैशाचा योग्य विनियोग व्हावा आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी ते कटिबद्ध आहेत.
आजच्या काळात जिथे निवडणूक जिंकण्यासाठी साम-दाम-दंड-भेदाचा वापर होतो, तिथे सौरभ मलुष्टे यांचा हा ‘कष्टाने पैसे आणि कामातून मते’ मिळवण्याचा निर्धार मतदारांना विशेष भावला आहे. प्रभाग ५ ला सौरभ यांच्या रूपाने एक आदर्श आणि सच्चा लोकप्रतिनिधी मिळणार असल्याची चर्चा आता नागरिकांमध्ये रंगली आहे.







