पेण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पहिल्यांदाच सहा नगरसेवक बिनविरोध विजयी झाले आहेत.
हे सहाही नगरसेवक भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युतीचे आहेत. यामुळे आता 24 पैकी 18 नगरसेवक पदासाठी 46 उमेदवार रिंगणात तर नगराध्यक्ष पदासाठी 3 उमेदवार रिंगणात उभे असून पेण नगरपरिषदेची निवडणूक मात्र चुरशीची होणार आहे.
गेली तीन दिवस उमेदवारी अर्जांची छाननी व अर्ज माघारी प्रक्रियेमुळे निवडणुकीत अनपेक्षित वळण पाहावयास मिळत आहे. पेण नगरपरिषदेत 12 प्रभागांमधून 24 नगरसेवक आणि एक थेट नगराध्यक्ष निवडून येणार होते. यंदाच्या निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस युती एकत्र येत असताना शिवसेना शिंदे गट स्वतंत्र लढत आहे. याशिवाय शिशिर धारकर यांची आम्ही पेणकर आघाडी, संतोष श्रृंगारपुरे यांची नगरविकास आघाडी आणि मनसेचा स्वतंत्र लढा यामुळे बहुकोनी स्पर्धा निर्माण झाली आहे.
एकूण 6 उमेदवार बिनविरोध
या तीन दिवसाच्या घडामोडीत महत्त्वपूर्ण घडामोड म्हणजे प्रभाग 9 (अ) मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर लढणारी वसुधा तुकाराम पाटील यांची प्रथम बिनविरोध निवड झाली. त्यानंतर झालेल्या छाननीत प्रभाग 5 (ब) प्रभागातून दीपक जयवंत गुरव ( राष्ट्रवादी काँग्रेस ), 12 (ब) प्रभागातून अभिराज कडू (भाजप ), 12 (अ) प्रभागातून सुशीला हरिश्चंद्र ठाकूर ( राष्ट्रवादी ), 11 (अ) प्रभागातून माळी स्मिता ( भाजप ) आणि 11 (ब) प्रभागातून मालती म्हात्रे (भाजप ) असे एकूण सहा नगरसेवक पदाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. निवडून आलेले सहाही नगरसेवक भाजप राष्ट्रवादी युतीचे असल्यामुळे युतीची ताकद वाढल्यामुळे पेण कर विकास आघाडी, इतर पक्षीय उमेदवारांनी मात्र हा धसका घेतला आहे.
नगराध्यक्ष पदासाठी तिघांत लढत
पेण नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजप महायुतीच्या प्रीतम ललित पाटील तसेच आम्ही पेणकर विकास आघाडी तर्फे रिया राहुल धारकर तर काँग्रेस आय पक्षातर्फे नंदा राजेंद्र म्हात्रे या तीन उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे.
नगराध्यक्ष पदासाठी तिघांत लढत
पेण नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजप महायुतीच्या प्रीतम ललित पाटील तसेच आम्ही पेणकर विकास आघाडी तर्फे रिया राहुल धारकर तर काँग्रेस आय पक्षातर्फे नंदा राजेंद्र म्हात्रे या तीन उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे.







