मालवण नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग ९-ब मधून भाजपच्या उमेदवार म्हणून सौ. अन्वेषा आचरेकर यांची घोषणा होताच प्रभागात नवा उत्साह पसरला आहे. दांडीतल्या मच्छिमार बांधवांपासून तर तरुणाई, महिला गट आणि स्थानिक व्यावसायिकांपर्यंत विविध घटकांशी सतत संपर्क ठेवत त्यांनी प्रचाराची दिशा बदलली आहे. मागील दहा वर्ष सातत्याने जनसंपर्क आणि प्रशासन जनतेतील दुवा हीच सौ अन्वेषा आचरेकर यांची ओळख मानली जाते.. एकीकडे मालवणात सगळीकडेच तिरंगी लढतीचे चित्र असताना प्रभाग क्रमांक नऊ ब चा कौल मात्र एकतर्फी भाजपला असेल अशा विश्वास सौ. अन्वेषा आचरेकर यांनी व्यक्त केला आहे. एकुणच प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात त्याच्या लढतीबद्दल साधलेला हा विशेष संवाद
❖ प्रश्न १ — भाजपा उमेदवारी जाहीर होताच प्रभागात मोठा प्रतिसाद उमटला. याविषयी काय वाटतं?
अन्वेषा आचरेकर:
“सर्वप्रथम माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आणि प्रभाग सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल पालकमंत्री नितेशजी राणे, खासदार मा. नारायणरावजी राणेसाहेब , जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी सावंत यांचे मी मनापासून आभार मानते. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच लोकांनी स्वस्फूर्तीने प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण केला, हीच माझी खरी ताकद आहे. दहा वर्ष सातत्याने क्षेत्रात काम केलं, समस्या सोडवल्या, लोकांच्यात मिसळले — हाच माझा बायोडाटा.”
❖ प्रश्न २ — तुमचा मुख्य प्रचार संदेश काय आहे?
अन्वेषा आचरेकर:
“मी कोणतेही अवास्तव वायदे करत नाही. जनतेला हवा असलेला विकास — तोच आमचा जाहिरनामा आहे. देशात, राज्यात आणि जिल्ह्यात सत्ता असलेला भारतीय जनता पक्ष हा आज मालवण शहराला आणि प्रभागाला सर्वाधिक आवश्यक आहे. निर्णयक्षम शासन, निधी, योजना आणि अंमलबजावणी — हे तीनही घटक BJPच्या सत्तेमध्ये प्रभावीपणे साध्य होतात. आज माझ्या प्रभागाची गरज हा विकास आहे, आणि विकासाची धमक फक्त भारतीन जनता पक्षात आहे हे आज सर्वच जाणून आहेत. “
❖ प्रश्न ३ — प्रभाग ९-ब म्हणजेच दांडी भागात मच्छिमारांचा मोठा वावर आहे. त्यांच्यासाठी काय योजना?
अन्वेषा आचरेकर:
“मच्छिमार बांधव हा आमच्या प्रभागाचा कणा आहे. केंद्र आणि राज्य सरकारने मच्छिमारांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. शेरे जमिनीचा प्रश्न असेल, किंवा प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना असेल किंवा मासेमारीला मिळालेला कृषी दर्जा ही आमच्या मच्छिमार बांधवासाठी विकासाची सुवर्णद्वारे आहेत. त्याच विकासाच्या प्रवाहात या प्रभागाला मला न्यायचे आहे आणि
मत्स्यविकास मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून या सर्व योजना माझ्या प्रभागात प्रभावीपणे आणणार आहे. महिला मच्छिमारांसाठी भक्कम व्यवसाय संधी, कर्जसाहाय्य, उत्पादन-विक्री केंद्रे यालाही प्राधान्य देणार.”
❖ प्रश्न ४ — मच्छिमार व्यवसायाचे भविष्य तुम्ही कसे पाहता?
अन्वेषा आचरेकर:
“मच्छिमारी हा परंपरागत व्यवसाय असला तरी आधुनिक तंत्रज्ञान, संरक्षण प्रणाली आणि नव्या मार्केटची आवश्यकता आहे. आज तरुणाईला या व्यवसायात नव्या संधी निर्माण करणे गरजेचे आहे — प्रोसेसिंग, पॅकेजिंग, स्टार्टअप मॉडेल्स, कोल्ड स्टोरेज… हे सर्व प्रभागात आणण्याची माझी योजना आहे अर्थात नगरपालिकेचा सक्षम प्रभाग या सर्व आर्थिक विकासगंगेला आणणारा सक्षम बनवणे हाच आमचा प्राधान्यक्रम आहे..”
❖ प्रश्न 5 — प्रभागासाठी तुमचे मुख्य प्राधान्यक्रम कोणते?
अन्वेषा आचरेकर:
“दांडी परिसरासाठी सर्वात महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे रिंग रोड. वाहतूक कोंडी, पर्यटनाची वाढ आणि स्थानिक व्यापारासाठी हा रस्ता अत्यंत गरजेचा आहे.
तसेच ‘खाऊ गल्ली’च्या माध्यमातून मी व्यवसाय आणि पर्यटनाचा सुंदर संगम घडवणार आहे. यामुळे तरुणाईला रोजगार मिळेल आणि प्रभागाची ओळखही उंचावेल.”
❖ प्रश्न 6 — निवडून आल्यावर प्रभागातील नागरिकांना कोणती हमी देता?
अन्वेषा आचरेकर:
“दरवाज्यासमोर उभं राहून सेवा करणं — हेच माझं ओळखपत्र आहे. प्रभागातील प्रत्येक समस्या माझीच समस्या आहे, आणि ती सोडवणं ही माझी जबाबदारी.
मालवणला, विशेषतः दांडी परिसराला, पुढील पाच वर्षांत विकासाच्या नकाशावर अग्रस्थानी आणण्याचं वचन मी देते.
सौ. अन्वेषा आचरेकर यांच्याशी हा विशेष संवाद मालवणच्या प्रभाग ९-ब साठी स्पष्ट प्राधान्यक्रम, मच्छिमार बांधवांसाठी ठोस योजना आणि महिला-तरुणाईसाठी नवी दिशा देणारा दृष्टिकोन दाखवते.
प्रभागात त्यांना मिळालेल्या लोकसहभागामुळे ही निवडणूक अधिकच उत्सुकतेची ठरली आहे.







