लांजा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर महायुतीने प्रथम टप्प्यातील ९ उमेदवारांची अधिकृत घोषणा केली आहे. ही यादी रविवारी आमदार किरण भैय्या सामंत यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली. उमेदवारांची निवड जाहीर होताच आमदार सामंत यांनी सर्वांना अभिनंदन देत विजयासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.
महायुतीचे जाहीर झालेले उमेदवार (पहिला टप्पा)
1️⃣ प्रभाग १ – सौ. निधी निलेश गुरव (शिवसेना)
2️⃣ प्रभाग २ – श्री. पंढरीनाथ बाळकृष्ण मायशेट्ये (शिवसेना)
3️⃣ प्रभाग ३ – सौ. श्रद्धा संजय तोडकरी (शिवसेना)
4️⃣ प्रभाग ४ – सौ. सानिका समीर जाधव (शिवसेना)
5️⃣ प्रभाग ६ – श्री. योगेश गोपीनाथ कावतकर (शिवसेना)
6️⃣ प्रभाग १० – श्री. प्रणाली गुरुप्रसाद तेली (भाजप)
7️⃣ प्रभाग १३ – सौ. साक्षी किशोर मानकर (शिवसेना)
8️⃣ प्रभाग १४ – श्री. वैभव यशवंत जोईल (शिवसेना)
9️⃣ प्रभाग १७ – सौ. शिवन्या शैलेश काळे (शिवसेना)
या उमेदवारी घोषणेमुळे लांजा नगरपंचायत निवडणुकीची तयारी आता वेगाने पुढे जात असून, महायुतीतर्फे आणखी उमेदवारांची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. विरोधकांकडून देखील जोरदार तयारी सुरू असल्याने आगामी काही दिवसांत लांज्यातील राजकीय वातावरण आणखी चुरशीचे होणार आहे. महायुतीने एकजुटीचा संदेश देत लांजानगरपरिषदेत सत्ता स्थापनेची आत्मविश्वासपूर्ण सुरुवात केली आहे.







