सावंतवाडी नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पार्टीतर्फे नगरसेवक तसेच नगराध्यक्ष पदासाठी आज उमेदवारी अर्ज अभूतपूर्व उत्साहात दाखल करण्यात आले. भाजप कार्यकर्त्यांचा शिस्तबद्ध सहभाग, घोषणाबाजी आणि एकजुटीमुळे सावंतवाडीतील बदलाची नवी पहाट आज स्पष्ट दिसून आली.
भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी सौ. श्रद्धा लखम सावंत भोसले यांनी अर्ज दाखल करून सावंतवाडीच्या सर्वांगीण विकासाचा, सुरक्षिततेचा व पारदर्शी प्रशासनाचा ठाम संकल्प व्यक्त केला. महिला नेतृत्वाच्या या नव्या शक्तीमुळे शहरामध्ये नव्या आशेचा किरण जागृत झाला आहे.
संपूर्ण कोकणात व आपल्या सावंतावडीमध्ये कमळ फुलवण्यासाठी देशाचे लाडके प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीसजी साहेब, माजी केंद्रीय मंत्री मा. श्री. नारायण राणे साहेब भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्र चव्हाण साहेब, आणि पालकमंत्री मा. श्री. नितेश राणेजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप सावंतवाडीत प्रचंड मताधिक्याने विजय मिळवण्यास पूर्णपणे सज्ज आहे.
यावेळी भाजप महाराष्ट्र युवा नेते आणि सावंतवाडीचे लोकप्रिय नेतृत्व मा. श्री. विशाल परब साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उमेदवारांनी अर्ज दाखल करत विजयरथाची भक्कम सुरुवात झाली. त्यांच्या नेतृत्वात सावंतवाडीला आधुनिक सुविधा, दर्जेदार पायाभूत सुविधा आणि नागरिककेंद्री योजना देण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
याप्रसंगी राणी सरकार शुभदा देवी भोसले, युवराज लखमराजे सावंत भोसले, भाजप युवा नेते विशाल परब, सौ. वेदिका परब, संदीप गावडे, शहराध्यक्ष सुधीर आडिवडेकर, मनोज नाईक आणि सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.







