“मालवण शहर जागतिक दर्जाचे बनवणार” — आमदार निलेश राणे
नागरिकांकडून आमदार राणे यांच्या दीर्घकालीन व्हिजनचे विशेष कौतुक
मालवण शहराला “जागतिक दर्जाचे, आदर्श आणि आधुनिक शहर” म्हणून घडवण्याचा संकल्प व्यक्त करत आमदार निलेश राणे यांनी मालवणच्या सर्वांगीण विकासाचा अष्टसूत्री आराखडा असलेले व्हिजन डॉक्युमेंट नागरिकांसमोर सादर केले. मालवणच्या परिवर्तनाला गती देण्यासाठी आगामी पाच वर्षांसाठीची ही विकासनिश्चिती नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केली.
अष्टसूत्री संकल्प – पुढील 5 वर्षांत मालवणमध्ये काय होणार?
सादर करण्यात आलेल्या आराखड्यानुसार खालील प्राधान्यक्रमित कामांवर लक्ष केंद्रित केले जाईल :
१) दर्जेदार वैद्यकीय सुविधा
- अत्याधुनिक वैद्यकीय सेवा
- प्रायमरी हेल्थ केअर सेंटरचे उन्नतीकरण
- नागरिकांना तातडीची आरोग्यसुविधा उपलब्ध करणे
२) दर्जेदार रस्ते – सॉईल टेस्टसह मजबुत बांधणी
मालवणकडे जाणारे अनेक रस्ते खड्डेमय होतात, यावर उपाय म्हणून
- सर्व प्रमुख रस्त्यांची सॉईल टेस्ट
- दीर्घकालीन निकषांनुसार रस्ते बांधणी
- सातत्यपूर्ण देखभाल व्यवस्था
३) विजेचे सुदृढीकरण
- भूमिगत वीजवाहिन्या
- नव्या सबस्टेशनची निर्मिती
- ट्रान्सफॉर्मर क्षमतेत वाढ
यामुळे शहरातील वीजपुरवठ्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
४) विकासात नागरिकांच्या घरांना अडथळा येणार नाही
राणे यांनी स्पष्ट केले की,
“विकास करताना एकाही नागरिकाला त्रास होणार नाही. कोणतेही घर, कोणतीही मालमत्ता विनाकारण बाधित होणार नाही.”
५) ड्रग्स कल्चरचे उच्चाटन
शहर सुरक्षित आणि सुसंस्कृत बनेल यावर भर.
ड्रग्स कल्चरला शून्य सहनशीलता धोरण.
६) पर्यटनस्नेही आणि स्वच्छ-सुंदर मालवण
सुंदर समुद्रकिनारे, धार्मिक स्थळे, वारसा-वास्तू यांचा विकास करून मालवणला पर्यटन केंद्र म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर उभे करण्याचा संकल्प.
७) एकात्मिक शहरसुशोभीकरण
- लाईटिंग, उद्याने, सांडपाणी व्यवस्था
- जलनिकासी आणि कचरा व्यवस्थापन
- स्मार्ट सिटी संकल्पना लागू
८) सर्वसमावेशक नागरी सुविधा
- विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना
- सार्वजनिक सोयीसुविधांची वाढ
- नागरिकांचा सक्रिय सहभाग
नागरिकांकडून व्हिजनला उत्स्फूर्त पाठिंबा
डॉ. शशिकांत झाट्ये आणि डॉ. राहुल पंत वालावलकर यांनी आमदार राणे यांच्या या व्हिजन डॉक्युमेंटचे प्रतिनिधिक स्वरूपात कौतुक करत,
“हे व्हिजन म्हणजे मालवणच्या भविष्याचे खरे मार्गदर्शन आहे”
असे मत व्यक्त केले.
“राणे साहेबांचे कार्य अभिमानास्पद” — दत्ता सामंत
या कार्यक्रमात बोलताना दत्ता सामंत म्हणाले,
“निलेश राणे यांचे कार्य राणे साहेबांच्या धाटणीचे असून ते निश्चितच जागतिक दर्जाचे मालवण शहर उभारतील. आज मालवणच्या नव्या इतिहासाची सुरुवात होतेय.”
मालवणच्या विकासासाठी आमदारांच्या हातात हात देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या अष्टसूत्री संकल्पाच्या माध्यमातून मालवण शहराला आधुनिक, सुरक्षित, पर्यटनसमृद्ध आणि नागरिककेंद्री रूप देण्याचा निश्चय आमदार निलेश राणे यांनी स्पष्ट केला असून, नागरिकांनी या व्हिजनला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.







