मालवण नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर भरड येथील मयेकर हेरिटेज सभागृहात मालवणमधील बुद्धिजीवी नागरिकांसोबत संवाद साधण्यासाठी आयोजित केलेली बैठक उत्साहवर्धक वातावरणात पार पडली. या बैठकीस मालवणचे आमदार श्री. निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
बैठकीत नगरपरिषदेच्या निवडणुकीसंदर्भातील सर्व महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. शहराच्या सर्वांगीण विकासाची दिशा, स्थानिक समस्या, त्यावरील उपाययोजना, तसेच नागरिकांच्या अपेक्षा—सूचना याबाबत खुला व सकारात्मक संवाद साधण्यात आला.
लोकशाही प्रक्रियेचा बळकटीकरण, प्रशासनातील पारदर्शकता आणि नागरिकांचा सहभाग वाढविणे हे या बैठकीचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे आमदार निलेश राणे यांनी स्पष्ट केले. मालवणच्या भविष्याचा विकास आराखडा अधिक सक्षम, सुबक आणि नागरिक-केंद्रित करण्यासाठी अशा बैठका अत्यंत महत्त्वाच्या असल्याचेही ते म्हणाले.
या संवादातून मालवण शहरासाठी एक दूरदृष्टीचा विकासमार्ग निश्चित करण्याचा प्रयत्न झाला असून आगामी निवडणुकीत शहरातील मतदार राजकीय जागरूकतेच्या दिशेने अधिक संघटित होत असल्याचे चित्र स्पष्ट झालं आहे.







