मालवण नगरपालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे प्रभाग क्रमांक सात मधूनगौरी मयेकर या अधिकृतरित्या रिंगणात उतरल्या असून, त्यांनी नगरविकासासाठी ठोस आश्वासने देत मतदारांना थेट भावनिक आवाहन केले आहे. नगरातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, महिला सुरक्षा, रोजगार आणि आरोग्यसेवा या प्रमुख मुद्द्यांवर उपाययोजना राबवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
‘मी तुमच्यापैकीच एक’ – थेट मतदारांना संदेश
“नगरातील समस्या मला समजतात; कारण मीही या समस्यांतूनच जात आहे. त्या दुर्लक्षित राहू नयेत म्हणूनच मी निवडणुकीत उतरते आहे,” असे सांगत गौरी मयेकर यांनी नागरिकांच्या वेदना आणि अपेक्षा प्रतिबिंबित करणारे निवेदन प्रसिद्ध केले.
🔸 गौरी मयेकर यांच्या प्रमुख घोषणा
शहरात व्यापक स्वच्छता अभियान
महिला संरक्षणासाठी विशेष आराखडा व सुरक्षित वातावरण
रोजगारनिर्मितीसाठी तरुणांसाठी नवे उपक्रम आणि स्टार्टअप प्रोत्साहन योजना
नगरातील अडकलेल्या पाणी व विजेच्या समस्यांचे समाधान
रस्ते आणि मूलभूत सुविधा सुधारणा
ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्यसेवा सुविधा आणि हेल्पलाइन
मालवणमध्ये महिला नेतृत्वाची एक नवी ताकद म्हणून गौरी मयेकर यांचे उदय होत असून खासकरून महिला, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांचा त्यांच्या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. शिवसेना स्थानिक स्तरावर त्यांच्या प्रचाराची जोरदार तयारी करत आहे.
“तुमचे एक मत आपल्या नगराचा चेहरा बदलू शकतो. परिवर्तनासाठी मला साथ द्या,” असे आवाहन करून त्यांनी आपल्या भाषणाची सांगता केली.
मालवणमध्ये आता निवडणुकीची रंगत वाढत असून, शिवसेनेच्या या उमेदवारीने स्थानिक राजकारणात नव्या घडामोडींना सुरुवात झाली आहे.







